माहूर गडावर कमलमुखी रेणुका मातेचे सुंदर कमलाकार मंदीर आहे. हे मंदीर अनादी काळापासून येथे असावे असे सांगण्यात येते. हे मंदीर यादवराजा देवगिरी यांनी सुमारे 800 ते 900 वर्षापूर्वी बांधले. मंदीराच्या मुख्यं दरवाज्याची पुन्रबांधणी ही इ.स. 1546 मध्ये झाली असून त्याची खुण मुख्य दरवाजावर बसविण्यात आली आहे. हया मंदीराचा विस्तार साडेतिनशे वर्षापूर्वी शालिवाहन राजाने इ.स. 1624 च्या सुमारास केला आहे. हे मंदीर वास्तु शास्त्राच्या नियमानुसार उभारण्यात आले आहे. मंदीर हे गाभारा व सभामंडप या दोन भागात विभागले गेले आहे. गाभा-यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. गाभा-याचे प्रवेशव्दार चांदीच्या व पत्र्याने मढविलेले आहे. देवीचा मुखवटा हा 1.524 मीटर (5 फुट) उंचीचा आहे आणि त्याची रुंदी 1.2192 मीटर (4 फुट) इतकी आहे.


web counter
Visit Count